Dharashiv News : शेतकरी अनुदानाच्या यादीत माजी आमदाराचं तब्बल ८ वेळा नाव; सरकारी पैशांवर डल्ला मारण्याचा डाव?
गेल्यावर्षी म्हणजेच 2023 मध्ये सोयाबीनचे भाव मोठ्या प्रमाणात गडगडले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही. सरकारने तातडीने सानुग्रह अनुदान जाहीर करावे, अशी मागणी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली. सरकारने देखील दयामाया दाखवत शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर ५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली. त्यानुसार दोन हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त १० हजार रुपये मिळणार आहेत.
मात्र, या सानुग्रह अनुदानाच्या यादीत एका माजी आमदाराचं तब्बल 8 वेळा नाव आल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या महोदयांसोबत त्यांच्या मुलाचे देखील यादीत 5 वेळा नाव आहे. त्यामुळे आता या माजी आमदारांचं कुटुंब शेतकरी झालंय की सरकारला घोटाळ्याची कला दाखवतंय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
सानुग्रह यादीत समावेश असलेल्या नावाप्रमाणे जर अनुदान मिळालं, तर माजी आमदारांना 80 हजार रुपये मिळणार आणि त्यांचे दोन मुलं मिळून 50 हजार रुपये घरी घेऊन जाणार आहे. त्यामुळे आता माजी आमदार घर चालवताय की खजिना भरताय, असा सवालही अनेकांनी उपस्थित केला आहे. माजी आमदारांचा हा 'अनुदान फंडा' कधी थांबणार आणि खऱ्या शेतकऱ्यांच्या पदरात काही पडणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.