VIDEO : शरद पवारांना परळीत जातीपातीचं राजकारण करायचंय, धनंजय मुंडेंचा नाव न घेता घणाघात

Dhananjay Munde News : बीडच्या परळी मतदारसंघातील घाटनांदुर येथे झालेल्या प्रचार सभेत आज धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटाबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे.

माझ्या विरोधात तुतारीकडून लढण्यासाठी एवढे जण तयार झाले, त्यात काही तुतारीचे निष्ठावंत होते आणि ते मतदारसंघात फिरायला लागले. त्यांच्या नेत्याला विचारून मला भिडायला लागले. मात्र यादरम्यान तुतारीचा उमेदवार जाहीर होण्यास विलंब होत असल्यानं, आपणच त्यांच्या एका नेत्याला फोन करुन लवकर उमेदवार फायनल करायला सांगितलं, असा मोठा गौप्यस्फोट धनंजय मुंडे यांनी परळीतून केला आहे. त्याचबरोबर लोकसभेत जसं केलं, तसंच आता विधानसभेतही हा आयात केलेला उमेदवार देऊन जातीपातीचे राजकारण केलं जात आहे आणि ते कोण करत आहे हे तुम्हा सर्वांना माहित आहे, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी नाव न घेता शरद पवारांवर पुन्हा एकदा शरसंधान साधलं आहे. ते बीडच्या परळी मतदारसंघातील घाटनांदुर येथे आज जाहीर सभेत बोलत होते.

यावेळी धनंजय मुंडे म्हणाले की, माझ्या विरोधात तुतारीकडून उमेदवार, एवढे ते उतावळे झाले. त्यात काही निष्ठावंत होते. फिरायला लागले, त्यांच्या नेत्याला विचारुन फिरायला लागले. त्यांचे नेतेही जे येईल, त्याला म्हणायचे लागा कामाला, तिकीट तुम्हालाच. एका घरातून तिघं, आई बी, लेक बी, जावई बी... एवढ्यावरच थांबले नाहीत, अनेकजण नडायला लागले. पण, 12 ते 13 जण झाल्यावर मलाच या सगळ्यांची काळजी वाटली. कारण तिकीट कुणालातरी मिळणार एकालाच आहे. म्हणून तुतारीच्या एका नेत्याला मीच फोन लावला आणि म्हटलं बाबा लवकर फायनल करा. तिकीट मिळालं नाही आणि त्यातले दोघं वेडे झाले आणि फिरायला लागले, तर शेवटी इथला लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची काळजीसुद्धा मलाच करावी लागेल ना..." असं म्हणत धनंजय मुंडे यांनी हा मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com