बिबट्यांच्या वाढत्या समस्यांवर मुख्यमंत्र्यांनी सांगितला अचूक उपाय, पाहा VIDEO

Devendra Fadnavis Leopard Human Conflict Solution: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज सकाळ माध्यम समूहाला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी राज्यात वाढत असेलल्या बिबट्यांच्या प्रकरणावर उपाय सांगितला.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मानवी वस्ती आणि वन्यजीव यांच्यातील वाढत्या संघर्षावर (Human-Animal Conflict) चिंता व्यक्त केली आहे. 'आपण शहरांचे नियोजन करतो, पण प्राण्यांच्या अधिवासाचा विचार करत नाही,' असे मत त्यांनी मांडले. विशेष म्हणजे, 'एका दीड जिल्ह्यामध्ये तब्बल १३०० बिबटे (1300 Leopards) आहेत,' अशी धक्कादायक आकडेवारी त्यांनी दिली. पश्चिम महाराष्ट्रातील बिबट्यांचा वावर आणि विदर्भातील वाघांचा (Tigers in Vidarbha) वाढता वावर यावर उपाय म्हणून 'ग्रासलँड्स' (Grasslands) तयार करणे आणि बिबट्यांचे निर्बीजीकरण (Sterilization) करणे यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समृद्धी महामार्गावरील प्रयोगाचा दाखला देत त्यांनी नवीन सर्वसमावेशक धोरणाची माहिती दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com