Devendra Fadnavis Speech Malshiras | मोदींमुळे सिंचनाच्या योजना पूर्ण झाल्या- देवेंद्र फडणवीस

शरद पवार, सुशीलकुमार शिंदे विजयसिंह मोहिते पाटील आपल्या घरातील मुला मुलींसाठी एकत्रित आले आहेत. सोलापुरातील माळशिरसमध्ये देवेंद्र फडणवीसांची सभा पार पडली.

Devendra Fadnavis Speech Malshiras | शरद पवार, सुशीलकुमार शिंदे विजयसिंह मोहिते पाटील आपल्या घरातील मुला मुलींसाठी एकत्रित आले आहेत. सोलापुरातील माळशिरसमध्ये देवेंद्र फडणवीसांची सभा पार पडली. ही सभा लोकसभा उमेदवार रणजित निंबाळकर यांच्यासाठी होती. यावेळी फडणवीसांनी सरकारने केलेल्या कामांचा पाढाच वाचलाय. मोदींमुळे सिंचनाच्या योजना पूर्ण झाल्या अशी आठवणही त्यांनी माळशिरसच्या सभेत लोकांना करून दिलीये. पुन्हा एकदा माढ्यातून रणजितसिंह नाईक निंबाळकर निवडून येणार असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलाय. रेल्वे आली, आता 36 गावातील लोकांना पाणी देणार असंही ते म्हणालेत. कृष्णा भीमा स्तिरीकरण योजनेसाठी प्रयत्न केले असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com