VIDEO: विधानसभेच्या पार्श्वभूमीवर Devendra Fadnavis यांनी घेतली मोहन भागवत यांची भेट

Devendra Fadnavis News: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संघ मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली, त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत, सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. यादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संघ मुख्यालयात जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली आहे. शुक्रवारी मुंबईत भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंचा स्तकार कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. त्यानंतर ते नागपूरला दाखल झाले. संघ मुख्यालयात जाऊन सरसंघचालक आणि संघाच्या इतर पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. विधानसभा निवडणूकीसाठी भाजपने नियोजनाला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी संघ मुख्यालयात जाऊन सरसंघचालकांची भेट घेतल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com