राज्यातील इतर पक्षही देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यानेच चालतात; भाजप मंत्र्याचा रोख कुणाकडे? VIDEO

Devendra Fadnavis Drives Maharashtra Politics: मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राज्यातील इतर पक्षही देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यानेच चालतात असा दावा केला आहे. मुंबई महापौरपदासाठी भाजपचा दावा आणि फडणवीसांच्या नेतृत्वाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चा पुन्हा तापल्या आहेत.

राज्याचे कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. ते शुक्रवारी एका आयोजित कार्यक्रमात बोलत होते. तसेच त्यांनी यावेळी मुंबईच्या महापौरपदी भाजपतर्फे दावा ठोकला. लोढा म्हणाले, आपण देवाभाऊंची विविध रूपं पाहतोय. त्यांची 100 वेगवेगळी रूपं आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी अनेक कामे केली आहेत. ते नागपूरचे सर्वात तरुण महापौर झाले. भाजप देवाभाऊमय तर आहेच. मात्र, राज्यातील इतर पक्ष कसे चालतील, हे देखील देवाभाऊच ठरवतात. मी गेल्या 25 वर्षांपासून बघतोय. राजकारण करण्याचे काम त्यांना कधी आवडते तर कधी नाही. मात्र, आपल्या कुटुंबातील सुखदुखात ते लगेच तत्पर असतात आणि अडचणी आल्या तर धावून येतात, असे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com