Devendra Fadanvis : निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीसांच महत्वाचं ट्विट !

Devendra Fadanvis Tweet On Assembly Election : राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

निवडणूका जाहीर होताच देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट केलं आहे. ''शंखनाद'' असं त्यांनी या ट्विटमध्ये लिहिलं आहे. त्यासोबत त्यांनी आपला एक व्हिडिओ देखील जोडला आहे. ज्यात ते भाजपचा झेंडा हातात घेऊन आक्रमकपणे भाषण करत असल्याचं दिसत आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकांचं बीगुल आता वाजलं असून मंगळवारपासून आचारसंहिता लागू झाली आहे. तर 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत विधानसभेचा हा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट शेअर केली आहे. ''शंखनाद''असा उल्लेख त्यांनी या पोस्टमध्ये केला आहे. सोबतच त्यांनी आपला एक व्हिडिओ शेअर केला असून यात भाजपचा झेंडा हातात घेऊन ते भाषण करताना दिसत आहेत. त्यामुळे आता विधानसभेत राजकीय घमासान रंगण्याची चिन्ह दिसून येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com