VIDEO : काकाकडून पुतण्याचं तोंडभरून कौतुक; अजितदादांच्या कौतुकावर रोहित पवारांचं मोठं विधान

Ajit Pawar And Rohit Pawar : काका पुतण्यात विस्तव देखील जात नसताना आता अजित पवार यांनी रोहित पवार यांची स्तुती केल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर ज्या काका - पुतण्यामध्ये विस्तवदेखील जात नाही त्याच काकाने आज पुतण्याचं तोंडभरून कौतुक केलं आहे. अजित पवार यांनी आमदार रोहित पवार यांचं तोंडभरून कौतुक केलं असल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. 'रोहितला कर्जत - जामखेडला पाठवलं, तो चांगलं काम करतो आहे.' अशी स्तुती अजित पवार यांनी रोहित पवार यांची केली आहे.

पक्ष फोडीच राजकारण केल्यापासून अजितदादा आणि रोहित पवार यांच्यात विस्तव देखील जात नसल्याचं सगळ्यांनी पहिलं आहे. मात्र आज अजित पवार आणि रोहित पवार काकाने पुतण्याच तोंडभरून कौतुक केल असल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. ''रोहितला कर्जत - जमखेडमध्ये पाठवलं, त्याने तिथे उत्तम कामगिरी केली आहे. '' अशा शब्दांत काका अजित पवार यांनी कौतुक केल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी त्यावर प्रतिक्रिया देत, ''त्यांनी माझ्या कामाचं कौतुक केलं आहे. मी कर्जत जमखेडमध्ये जोरदार काम केलं आहे. त्याबद्दल एक पुस्तक देखील काढलं आहे. विरोधकांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील ते पुस्तक पाठवण्याची मी सोय करेल.'' असं म्हंटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com