VIDEO: Pandharpur विठ्ठल मंदिरामध्ये VIP दर्शन बंद करण्याचा निर्णय

Pandharpur News: पंढरपुर विठ्ठल मंदिरामध्ये VIP दर्शन बंद करण्याचा निर्णय, Saam TV ने प्रसिद्ध केलेल्या बातमीचा Impact.

पंढरपुर विठ्ठल मंदिरामध्ये VIP दर्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंदीर समितीकडून हा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयामुळे दर्शन रांगेतील भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. VIP दर्शनामुळे भाविकांचे हाल होतात अशी बातमी Saam TV ने प्रसिद्ध केली होती. त्यानंतर विठ्ठल मंदिरात VIP दर्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. अनेक भाविक दर्शनासाठी मंदिरात येत असतात परंतु होणाऱ्या गर्दीमुळे भाविकांना पदस्पर्श दर्शन घेता येत नाही. परंतु आता VIP दर्शन बंद केल्यामुळे भाविकांना मंदिरात पदस्पर्श दर्शन करता येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com