Nashik Lok Sabha: आमचा दावा, नाशिकची जागा शिवसेनेची! दादा भुसे थेटच बोलले

Dada Bhuse on Nashik Lok Sabha Election 2024: दादा भुसे यांनी नाशिकच्या जागेवर दावा केला आहे. नाशिकच्या जागा शिवसेनेलाच मिळेल, असा विश्वासही मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केलाय.

नाशिक : नाशिकमधून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या हेमंत गोडसे यांचा हिरमोड होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. सागर बंगल्यावर झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत नाशिकच्या जागेचा तिढा सुटला असल्याची शक्यता वर्तवली जातेय. या बैठकीतून छगन भुजबळ यांच्या नावावर सकारात्मक चर्चा झाली असल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान, दादा भुसे यांनी नाशिकच्या जागेवर दावा केला आहे. नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळेल, असा विश्वासही मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केलाय. अशातच आता नाशिकच्या जागेबाबत महायुतीकडून नेमकी कुणाच्या नावाची घोषणा होते, हे पाहणं महत्त्वाचंय. हेमंत पाटील यांच्या समर्थकांनी नाशिकच्या जागेसाठी आग्रही मागणी केल्याचं सांगितलं जातंय. मात्र आता नाशिकची जागा शिवसेनेला मिळते, की राष्ट्रवादी काँग्रेसला याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com