Yogesh Kadam : योगेश कदम यांचं बॅनर फडणाऱ्यांवर कारवाई ?

Ratnagiri News : रत्नागिरीत आमदार योगेश कदम यांचं बॅनर फडल्याने वाद उफाळला आहे. त्यांच्या समर्थकांकडून रास्तारोको करत आरोपींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

रत्नागिरीत आमदार योगेश कदम यांचं बॅनर फडल्याने वाद उफाळला आहे. गणरायांच्या शुभेच्छा देणारे बॅनर फडल्याने हा वाद झाला आहे. आमदार कदम यांच्या समर्थकांकडून रास्तारोको करत आरोपींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

रत्नागिरीत आमदार योगेश कदम यांचे गणपती उत्सवाच्या शुभेच्छा देणारे बॅनर लागले होते. ही बॅनर अज्ञात इसमांकडून फडण्यात आले. तर काही बॅनरसोबत छेडछाड करण्यात आली आहे. यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले. बुधवारी कदम समर्थकांनी दापोली - खेड रस्त्यावर रास्तारोको करत या घटनेचा निषेध केला. तसेच आरोपींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. दरम्यान, यावर पोलिसांकडून काय कारवाई करण्यात येते हे पहाणे गरजेचे ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com