VIDEO: काँग्रेसची विधानसभेत स्वबळाची तयारी? Anil Deshmukh यांनी स्पष्टचं सांगितलं

Anil Deshmukh News: कॉंग्रेसच्या गोठातून मोठी बातमी, कॉंग्रेस स्वबळावर लढण्याची तयारी करत असल्याचा कॉंग्रेस नेते नितीन राऊत यांचा सूचक इशारा.

कॉंग्रेसच्या गोठातून मोठी बातमी समोर येत आहे. कॉंग्रेस स्वबळावर लढण्याची तयारी करत असल्याचा सूचक इशारा कॉंग्रेस नेते नितीन राऊत यांनी दिला आहे. २८८ जागांची चाचपणी होत असून कॉंग्रेस मोठा पक्ष असल्याचं राऊत म्हणाले. यावर अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. आमच्यात कोणी मोठा भाऊ नाही, आमच्यात कोणी छोटा भाऊ नाही. असं म्हणत जागांबद्दलचा निर्णय महाविकास आघाडीचे कोर कमिटी घेईल असं देशमुख म्हणाले. सर्वांना वाटतं आम्हाला जास्त जागा मिळायला पाहिजे मात्र याबद्दलचा निर्णय कोर कमिटी घेते, कोणत्या मतदार संघात कोणाचा उमेदवार निवडूण येईल या निकषावर जागांचे वाटप होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com