CM Devendra Fadnavis: बेकायदा होर्डिंग लावणाऱ्यांना थेट मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा|VIDEO

Illegal Hoardings to Face Strict Action: शहरात वाढत्या अनधिकृत होर्डिंगमुळे अनेक अपघात होण्याची शक्यता आहे, किंबहुना मुंबईमध्ये देखील एक होर्डिंग कोसळल्यामुळे मोठी जीवितहानी झाली होती. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

संपूर्ण राज्यभरात सध्या बेकायदा होर्डिंग अनेक वर्षांपासून दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर महापालिका प्रशासनाने वारंवार बेकायदा होर्डिंग लावणार यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महापालिकेने दिलेली परवानगी पाहूनच होर्डिंग छापण्यात यावेत अन्यथा संबंधितांच्या मशीन देखील जप्त करण्यात येतील असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला. ते छत्रपती संभाजीनगर येथे बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझा फोटो असलेले बेकायदेशीर बॅनर सुद्धा असतील ते देखील काढा माझ्या कार्यकर्त्यांनी जर ते बॅनर लावले असेल त्यावर देखील कारवाई करण्याचे आदेश फडणवीस यांनी दिले. यामुळे शहराचे विद्वपीकरण होते असेही फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com