Mahayuti Politics : विधानसभेत भाजपची कुरघोडी, शिंदे गटात नाराजी; मुख्यमंत्र्यांसमोर बंडखोरांचं आव्हान, VIDEO

eknath shinde Group : वर्षा बंगल्यावर फडणवीस आणि शिंदेंमध्ये बैठक झाली...या बैठकीत एकनाथ शिंदेंनी फडणवीसांकडे काही जागांबाबत नाराजी व्यक्त केली...शिंदे आणि फडणवीस यांच्यात काय चर्चा झाली...पाहुयात यामागची इनसाईड स्टोरी...
विधानसभेत भाजपची कुरघोडी, शिंदे गटात नाराजी; मुख्यमंत्र्यांसमोर बंडखोरांचं आव्हान, VIDEO
Maharashtra Assembly Election 2024Saam Tv
Published On

मुंबई : विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपनं 99 उमेदवारांची यादी जाहीर करत कुरघोडी केली. भाजपने या यादीत शिवसेनेच्या ताब्यात असणाऱ्या 5 जागांवरही उमेदवार जाहीर केले. मात्र, भाजपच्या या पवित्र्याने शिवसेना शिंदे गट नाराज झालाय..शिवसेनेला विचारात न घेता भाजपने जाहीर केलेल्या यादीबाबत कालच्या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विधानसभेत भाजपची कुरघोडी, शिंदे गटात नाराजी; मुख्यमंत्र्यांसमोर बंडखोरांचं आव्हान, VIDEO
Maharashtra Politics: मविआच्या नाराजीनाट्यावर पडदा! काँग्रेसचा 'हा' नेता वाद मिटवणार, शरद पवार- ठाकरेंशी चर्चा करणार

जागा वाटपावरून महाविकास आघाडीत वाद सुरू असल्याचे दिसतंय... तर, दुसरीकडे महायुतीत सगळं काही आलबेल असल्याचा दावा केला जात होता. मात्र, महायुतीमध्येही नाराजीनाट्य सुरू असल्याचं दिसतंय.

भाजपविरोधात शिंदे गटात नाराजी?

1. कल्याणात भाजपची सुलभा गायकवाडांना उमेदवारी

2. कल्याणात शिंदेंच्या शिवसैनिकांचा सोडचिठ्ठीचा इशारा

3. ठाण्यात भाजपकडून संजय केळकरांना उमेदवारी

4. ठाण्यात भाजपच्या केळकरांविरोधात मिनाक्षी शिंदेंचं बंड

5. भाजपची धुळे, अचलपूर, उरण, नालासोपारा, देवळीत उमेदवारी

विधानसभेत भाजपची कुरघोडी, शिंदे गटात नाराजी; मुख्यमंत्र्यांसमोर बंडखोरांचं आव्हान, VIDEO
Maharashtra Politics: नगरचं राजकारण तापलं! काल जयश्री थोरातांनी झापले, आज सुजय विखेंनी पुन्हा डिवचले!

भाजपचे आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणानं कल्याण पूर्वेत निवडणुकीपुर्वीच शिंदे-भाजप गटात फुट पडली. मात्र महायुतीतील मोठा भाऊ भाजपनं कुरघोडीचं राजकारण करत गायकवाडांच्या पत्नीला उमेदवारी दिल्यानं शिंदेंच्या शिवसैनिकांची नाराजी उफाळलीये. कमी अधिक प्रमाणात राज्यात हीच स्थिती असल्याचं चित्र आहे. त्यामुळे नाराजांना कसं राजी करायचं आणि बंडोंबांना कसं थंड करायचं हा पेच शिंदेंना सोडवावा लागेल अन्यथा महायुतीत बेबनाव अटळ आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com