Viral Video : भर सभेत विशाल पाटील - संजय पाटील एकमेकांना भिडले !

Sangli Tisgaon News : तासगाव नगरपालिकेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात आजी-माजी खासदारांत वाद झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

तासगाव नगरपालिकेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी सांगलीचे आजी-माजी खासदार भर सभेतच भिडल्याचा प्रकार घडला आहे. तासगावमध्ये खासदार विशाल पाटील आणि भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांच्यात जोरदार वादावादी झाली. यावेळी संजयकाका पाटील समर्थकांनी थेट खासदार विशाल पाटलांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला आहे.

तासगाव नगरपालिकेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी कामगार मंत्री सुरेश खाडे यांची उपस्थिती होती. यावेळी आजी-माजी खासदारांत चांगलीच जुंपलेली बघायला मिळाली. तासगाव मधल्या रिंग रोड मंजुरी मुद्द्यावरून विशाल पाटलांनी केलेल्या भाषणाला संजय काका पाटलांनी आपल्या भाषणातून अक्षय घेतला यानंतर खासदार विशाल पाटलांनी देखील संजय काका पाटलांच्या आरोपांवर आक्षेप घेतल्यानंतर या दोन्ही आजी-माजी खासदारांमध्ये व्यासपीठावरच वाद झाल्याचं समजत आहे. यावेळी संजयकाका पाटील समर्थकांनी आक्रमक भूमिका घेत खासदार विशाल पाटलांकडे धाव घेतली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं. दरम्यान, आजच्या प्रकरणावरून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये याचे आणखी पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com