VIDEO : अजितदादाची डोकेदुखी वाढली; शिरूर हवेलीमध्ये बंडखोरी अटळ

Ajit Pawar Rashtravadi Group : शिरूर हवेलीमध्ये अजित पवार यांच्या पदाधिकाऱ्यांकडून एन विधानसभेच्या तोंडावर बंडखोरीची शक्यता आहे.

शिरूर हवेलीमध्ये अजितदादाची डोकेदुखी वाढलेली आहे. आयात उमदेवार आणल्यास मतदार संघात मोठी बंडखोरी निर्माण होण्याची शक्यता आहे. शिरूर हवेलीची जागा मिळणे अजितदादा गटाला महत्वाचे आहे.

अजित पवार राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाच उमेदवारी मिळावी बाहेरचा उमेदवार आयात केल्यास बंडखोरी अटळ असल्याचं मत कार्यकर्त्यांनी म्हंटलं आहे. यासंदर्भात पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे. शिरूर हवेलीची जागा अजित पवार गटालाच मिळावी अशी पदाधिकाऱ्यांची बैठकीत मागणी आहे. अजित पवार गटाचे शिरूर हवेलीचे अध्यक्ष शांताराम कटके यांच्या विरोधात शरद पवार गटाचे आमदार अशोक पवार हे रिंगणात येऊ शकतात. मात्र अजित पवार राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाच उमेदवारी मिळावी असं पदाधिकाऱ्यांचं म्हणण आहे. बाहेरचा उमेदवार आयात केल्यास बंडखोरी अटळ असल्याचं सांगण्यात आलं येत आहे. त्यामुळे अजितदादांची डोकेदुखी वाढणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com