Amravati : अमरावती जिल्ह्यात चिकनगुनिया आणि डेंग्यूचा कहर, तब्बल ५९२ रुग्णांची नोंद | VIDEO

Chikungunya and Dengue Cases : अमरावती जिल्ह्यात चिकनगुनिया आणि डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढल्याचं चित्र समोर आले आहे. जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान चिकनगुनियाचे तब्बल 282 रुग्ण, तर डेंग्यूचे 310 रुग्ण आढळले आहेत.

अमरावती जिल्ह्यात चिकनगुनिया आणि डेंग्युचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याचे समोर आले आहे. जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान चिकनगुनियाचे तब्बल 282 रुग्ण, तर डेंग्यूचे 310 रुग्ण आढळले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान उभं राहिलं आहे. जिल्हा आरोग्य विभागाकडून नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबवण्यात येत असली तरी आजाराचा फैलाव थांबत नाहीये. विशेषतः ग्रामीण भागात रुग्णसंख्या अधिक असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. प्रशासनाने नागरिकांना साचलेलं पाणी त्वरित काढून टाकण्याचं, परिसर स्वच्छ ठेवण्याचं आणि मच्छर प्रतिबंधक उपाय करण्याचं आवाहन केलं आहे. आरोग्य विभागाने सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com