Chhatrapati Shivaji Maharaj Waghnakha: "ती" वाघनखं महाराजांची नाहीत?
Chhatrapati Shivaji Maharaj Waghnakha: इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी पत्रकार परिषद घेतली. लंडन इथून आणणाऱ्या वाघनखांवर इंद्रजित सावंत महत्त्वाचं बोललेत. लंडन इथून आणणारी वाघनखे ही छत्रपती शिवरायांची नाहीत. व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमकडून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना केलेल्या पत्रव्यवहारात माहिती उघड झालीय. यावेळी बोलताना जनतेची सरकारने दिशाभूल करू नये असं म्हणालेत. 1971 मध्ये ही वाघनखे लंडनमध्ये ठेवण्यात आली आहेत त्यामुळे ही खरी नाहीत असं इंद्रजित सावंत यांनी म्हटलंय. सरकारचं यामुळे बिंग फुटलंय, ही वाघनखे शिवाजी महाराजांचीच आहेत असा लंडन संग्रहालयाने दावा केलेला नाही. त्याचबरोबर वाघनखांच्या प्रतिकृतीवर करोडो रुपये खर्च करू नका असं सावंत म्हणालेत. आणखी काय म्हणालेत इंद्रजित सावंत बघुयात...
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.