Chhagan bhujbal News : नाराज छगन भुजबळ बंड करणार की थंड होणार? पाहा स्पेशल रिपोर्ट,VIDEO

Chhagan bhujbal update : काही दिवसांपूर्वी मंत्रिपदावरुन बंडाच्या भूमिकेत असलेले छगन भुजबळ परदेशातून परतताच थंड झालेत का अशा चर्चा रंगल्यात. मात्र छगन भुजबळ आता काय निर्णय घेणार ते राष्ट्रवादी सोडणार की भाजपात जाणार पाहूया...

महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ चांगलेच दुखावले होते. नाराज झालेल्या छगन भुजबळांनी आपल्या मनातील खदखदही बोलून दाखवली. तर, दुसरीकडे भुजबळांच्या समर्थकांनी आंदोलन केले. भुजबळांच्या नाराजीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं. दरम्यान याबाबत काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवारांनी महायुतीला टोला लगावलाय. तर अतुल सावेंनी सावध प्रतिक्रीया दिलीये.

मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सागर बंगल्यावर भेट घेतली होती. आता भुजबळांनी याबाबत स्वतःच प्रतिक्रीया दिलीये.

“जहाँ नहीं चैना वहा नहीं रहना” म्हणणाऱ्या भुजबळांकडे तसे मोजकेच पर्याय उपलब्ध आहेत. तर दुसरीकडे तुर्तास छगन भुजबळ यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार नाही अशी माहिती सुत्रांनी दिलीये..महायुतीत वाद नको म्हणून भाजप हायकमांडनं हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे भुजबळांचं बंड थंड होणार की भुजबळ काही वेगळा निर्णय घेणार यासाठी आणखी काही दिवस वाट पहावी लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com