Nashik News: छगन भुजबळ तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना! नाशिकच्या जागेचा तिढा मुंबईतून सोडवला जाणार?

Nashik Lok Sabha Election 2024 LIVE: दिलीप खैरे यांच्या भावाने उमेदवारी अर्ज घेतल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दिलीप खैरे हे भुजबळांचे विश्वासू समजले जातात.

नाशिक : छगन भुजबळ हे तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. एकीकडे नाशिक लोकशभेची जागा महायुतीत कोण लढवणार? हा तिढा कायम आहे. अशातच भुजबळ मुंबईला तातडीने रवाना झाल्यानं तर्क वितर्कांना उधणा आलं आहे. आजपासून नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अशातच दिलीप खैरे यांच्या भावाने उमेदवारी अर्ज घेतल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दिलीप खैरे हे भुजबळांचे विश्वासू समजले जातात. खैरेंनी उमेदवारी अर्ज घेणं, यामागे भुजबळांची राजकीय खेळी असल्याचं बोललं जातं. नाशिक लोकसभेतून भुजबळांनी माघार घेतल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतरही नाशकातून महायुतीमध्ये रस्सीखेच काय असल्याचं पाहायला मिळतंय. या राजकीय चर्चा सुरु असतानाच अचानक भुजबळ मुंबईच्या दिशेने रवाना होण्याचं कारण काय? यावरुन राजकीय वर्तुळात कुजबूज सुरु झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com