VIDEO: Chhagan Bhujbal मंत्रीपदाचा मराठ्यांविरोधात गैरवापर करतात, जरांगेंचा गंभीर आरोप

Manoj Jarange News: मनोज जरांगे यांनी सरकारवर निशाणा, भुजबळ मराठ्यांच्या विरोधात मंत्रीपदाचा गैरवापर करतात जरांगेंचा आरोप.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा दौरा नांदेडहून लातूरकडे रवाना झाला आहे. यादरम्यान मनोज जरांगे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. फडणवीस भुजबळ यांना बळ देतात हे आता जनतेच्या लक्षात आलं आहे फडणवीस यांनी भुजबळ यांना मंत्रीपद दिलं, त्याचा गैरवापर ते मराठ्यांच्या विरोधात करत आहेत असा घणाघात जरांगे पाटील यांनी केला आहे. मराठ्यांचे 2-4 माकड फडणवीस यांच्या बाजूने बोलतात त्यामुळे समाजात नाराजी असल्याचंही ते म्हणाले. मंत्री गिरीष महाजन म्हणतात हे आरक्षण टिकणार नाही, म्हणजे आरक्षण हेच देणार आणि उडवणार पण हेच. तुम्ही बदललात म्हणून आमच्या मुळ मागणीवर आम्ही परत आलो असं जरांगे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com