Mumbai News: चेंबूर गोळीबार प्रकरणात दोन आरोपी अटकेत|VIDEO

Chembur Firing Case: बाईकस्वारांनी कारचा पाठलाग करून दोन गोळ्या झाडल्या. या बांधकाम व्यावसायिकावर हल्ला का करण्यात आला हे अद्याप स्पष्ट झाले नाहीये. याप्रकरणाचा मुख्य आरोपीच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.

मुंबईत दोन दिवसापूर्वी घडलेल्या एका घटनेने मोठी खळबळ उडाली होती. बुधवारी एका बांधकाम व्यवसायिकावर गोळीबार झाला सदरुद्दीन खान असा गोळीबारात जखमी झाले व्यक्तीचे नाव आहे. सदृद्दीन खान पेशाने बांधकाम व्यावसायिक आहेत. चेंबूर येथे डायमंड गार्डनच्या सिग्नलवर हा गोळीबार झाला होता.

यावेळी गाडीत सदरुद्दीन खान आणि त्यांचा चालक बसलेला होता. भर वस्तीत रात्री साडेनऊच्या सुमारास गोळीबाराची ही घटना घडल्याने संपूर्ण चेंबूर परिसरात हा धरून गेला होता. यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. सायन-पनवेल महामार्गावरून सदरुद्दीन खान नवी मुंबईला जात असताना डायमंड सिग्नल येथे त्यांचा गोळीबार झाला. याच प्रकरणातील आता पोलिसांनी दोन जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. फिरोज बद्रुद्दीन खान असं या आरोपीचे नाव आहे. मात्र त्यांनी गोळीबार का केला? हे अद्यापही स्पष्ट झालं नाहीये. याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com