Chandrapur Lok Sabha News | चंंद्रपुरात बोगस मतदान! मतदान यादीतला घोळ चव्हाट्यावर..

Loksabha Election Update | चंद्रपुरात बोगस मतदानाचा भोंगळ कारभार समोर, अनेक मतदारांची उडाली तारांबळ

चंद्रपूर येथे अनेक मतदार मतदानापासून वंचित राहीले, तर अनेकांच्या नावाने बोगस मतदान केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. मतदान केंद्रावर येऊन अनेक मतदारांना मतदान न करताच माघारी फिरावं लागलंय. मतदान कार्ड सोबत असताना, केवळ यादीत नाव नसल्यामुळे अनेक मतदारांना पुन्हा माघारी फिरावं लागलं. याव्यतिरीक्त अनेक मतदारांच्या नावार बोगस मतदान झाल्याचंही धक्कादाय चित्र समोर आलंय. मतदान यादीतल्या या घोळामूळे अनेक मतदारांची तारांबळ झाल्याचं पहायला मिळालं. चंद्रपूरचे भाजप उमेदवार सुधिर मुनगंटीवार यांनी मतदान यादीत घोळ झाल्याचं मान्य केलंय. यासंदर्भात बैठक आयोजित करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. मतदार यादीतल्या या घोळामुळे चंद्रपुरात मतदानाची टक्केवारीही कमी झाल्याचंही पहायला मिळालं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com