... तर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाईल - चंद्रकांत पाटील|VIDEO

Dhananjay Munde News : धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपात तथ्य असेल तर देवेंद्र फडणवीस कारवाई करतील, त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतील, असे वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीमध्ये केलेय.

Chandrakant Patil on dhananjay munde News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि बीडमधील प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून आरोप केले जात आहे. भाजप आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी काँग्रेस (पवार गट) बजरंग सोनवणे यांच्यासह अनेकजणांकडून धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले जात आहेत. धनंजय मुंडे याला जबाबदार असल्याचा आरोप होतेय. जर या आरोपात तथ्य असेल तर देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतील, असे वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेय.

बीड प्रकरणात धनंजय मुंडेंबाबत तथ्य असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांचा राजीनामा घेतील, पण वाल्मिकी कराडबाबत टप्प्या-टप्प्याने कारवाई सुरू असून ती समाधानकारक आहे, असं विधान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेय. ते सांगलीत बोलत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com