Mahayuti CM Candidate News : महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा दावेदार ठरला ? कोणाच्या गळ्यात पडणार माळ, पाहा Video

Home Minister Amit Shaha News : अमित शहा यांनी काल बैठकीत मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निर्देश दिले आहेत.

महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असा प्रश्न सातत्याने नेत्यांना विचारला जात आहे. याबाबत आता महायुतीकडून निर्णय घेण्यात आला असून निवडणुकीनंतर आमदारांच्या संख्येवरून मुख्यमंत्र्याची निवड केली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. काल अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

महायुतीचा मुख्यमंत्री हा आमदारांच्या संख्याबळावरून निवडणुकीनंतर ठरवण्यात येणार आहे. त्यामुळे नेमका मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केलेला नसला तरी महायुतीचं मुख्यमंत्रीपदासाठीच सूत्र मात्र आता समोर आलं आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन जागावाटपाच्या मुद्द्यावर अंतिम चर्चा केली. या बैठकीतच मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडण्याबद्दल चर्चा झाली असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. महायुतीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री निवडताना आमदारांचं संख्याबळ बघून मुख्यमंत्री ठरवला जाईल असे थेट निर्देश अमित शहा यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिले आहेत. त्यामुळे आता कोणाच्या गळ्यात मुख्यमंत्र्याची माळ पडेल हे आगामी काळात बघणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com