CBSE Announces Board Exam Schedule: दहावी-बारावी बोर्ड परीक्षा अपडेट! केंद्रीय मंडळाने जाहीर केले वेळापत्रक|VIDEO

CBSE Reveals Winter Session Exam: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा, प्रयोगात्मक परीक्षा, प्रोजेक्ट मूल्यांकन आणि अंतर्गत मूल्यमापनाचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

देशभरातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या प्रयोगात्मक परीक्षा, प्रोजेक्ट मूल्यांकन आणि अंतर्गत मूल्यमापनांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

याअन्वये, देशभरातील हिवाळी सत्रावर चालणाऱ्या शाळांमध्ये या परीक्षा ६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२५ दरम्यान पार पडणार आहेत. तर इतर सर्व शाळांमध्ये प्रयोगात्मक परीक्षा १ जानेवारी २०२६ पासून सुरु होतील. विद्यार्थ्यांनी वेळापत्रकानुसार तयारी सुरू ठेवण्याचे आणि आवश्यक ती तयारी वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com