VIDEO : लॅपटॉप, मोबाइल अन् बरंच काही...भोंदू कॅप्टन खरातचे आणखी काळे कारनामे उघड होणार

Nashik SIT questioning self proclaimed Captain Kharat : महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरातची दोन तासांपासून एसआयटी चौकशी सुरू आहे. त्याच्या चौकशीतून आणखी धक्कादायक गोष्टी उघड होण्याची शक्यता आहे.

'कॅप्टन फाइल्स'चा पर्दाफाश झाल्यानंतर भोंदू अशोक खरातचे आणखी काही काळे कारनामे उघड होण्याची शक्यता आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्या या स्वयंघोषित भोंदूची २ तासांपासून चौकशी सुरू आहे. नाशिकच्या पोलीस क्लबमध्ये एसआयटी पथकाकडून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.

खरातच्या घरातून लॅपटॉप, मोबाइल आणि महत्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. त्यासंदर्भात आता चौकशी करण्यात येत आहे. महिलांवरील लैंगिक अत्याचाराबाबत खरातवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात येत आहे. आता एसआयटीच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खरातने अनेक महिलांचे शोषण केल्याची माहिती असून त्याबाबत सर्व माहिती मिळवण्याचे काम सध्या सुरू आहे. सध्या तीन महिला तक्रार देण्यासाठी पुढे आल्या आहेत, अशी माहिती आहे. आणखी काही महिला पुढे येऊन तक्रार करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com