अभिजीत सोनवणे, साम टीव्ही
नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील एका दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर संतप्त जमावाने हल्ला केला. या मारहाणीत इगतपुरी पोलिस ठाण्याचे दोन कर्मचारी कृष्णा गोडसे आणि रामदास वाघ यांना मारहाण करून त्यांचे कपडे फाडण्यात आले. पोलिसांवर झाडावर लटकलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाच्या चौकशीदरम्यान हल्ला झाला. ही घटना चार दिवसांपूर्वी घडली होती. पोलिसांनी सदर मृत व्यक्तीने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला होता. मात्र, त्यानंतर परिसरातील आदिवासी समुदायामध्ये संतापाची लाट उसळली. या पार्श्वभूमीवर पोलिस चौकशीसाठी गेले असता जमावाने थेट पोलिसांवरच हल्ला चढवला. जमावाने पोलिसांच्या डोक्यात काचेच्या बॉटल फोडल्या यामुळे पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली असून याबाबत अधिक तपास करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.