शिंदेसेना नकोच! जिल्हा परिषद निवडणुकीआधी जोरदार राडा, भाजप कार्यकर्त्यांचा मंत्री, आमदारांना घेराव घालण्याचा प्रयत्न

zilla parishad elections sambhajinagar latest update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 63 जिल्हा परिषद गटांपैकी 25 जागा या शिवसेना लढणार आणि 27 जागा भाजप लढणार आहे. सोयगाव आणि सिल्लोड तालुक्यातील 11 ठिकाणी युती झाली नाही. त्या ठिकाणी भाजप आणि शिवसेना हे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदे शिवसेनेची अखेर युती झाली आहे. शिवसेना 25 तर भाजप 27 जागा लढवणार असल्याची घोषणा शिवसेनेकडून पालकमंत्री संजय शिरसाट तर भाजपकडून मंत्री अतुल सावे यांनी घोषणा केली. ही युती जिल्ह्यातील केवळ सात तालुक्यात असणार आहे. मात्र सोयगाव आणि सिल्लोड या दोन तालुक्यातील 11 ठिकाणी युती न करता शिवसेना आणि भाजप हे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत.

महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये इच्छुकांचा जसा राडा झाला होता, तसाच राडा आज जिल्हा परिषद निवडणुकीसाठी झालेल्या युतीच्या घोषणेनंतर त्याच ठिकाणी झाला. वैजापूर तालुक्यातील भाजपचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी थेट मंत्री अतुल सावे आणि भाजप आमदारांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. त्यासोबतच गाडी अडवली. त्यामुळे काही काळ राडा आणि गोंधळ झाला होता. वैजापूर तालुक्यातील आठ जागांपैकी केवळ तीन जागा भाजपला मिळाल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला. अनेक वर्षे आम्ही निवडणुकीची तयारी करीत होतो. मात्र ती जागा शिवसेनेला गेली. भाजपवर टीका करणाऱ्या उमेदवाराला ही जागा मिळणार, त्यामुळं आता आम्ही त्यांच्यासाठी काम करायचं का, असा प्रश्न उपस्थित केला. महापालिकेच्या निवडणुकीत जसा गोंधळ छत्रपती संभाजीनगरमध्ये झाला होता, तीच गत आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या अर्ज भरण्यापासूनच झाली आहे. सिल्लोड आणि सोयगाव या दोन तालुक्यातील 11 जागांवर युती करणार नाही. मी स्वतंत्र लढणार, असं शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितलं. त्यामुळे तिथं युती झाली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com