Chandrashekhar Bavankule : माविआ राज्याचा बट्ट्याबोळ करेल; बावनकुळेंचा हल्लाबोल | Video

Bavankule Criticized Mahavikas Aghadi : 'महाविकास आघाडीची सत्ता चुकूनही राज्यात आली, तर माविआ राज्याचा बट्ट्याबोळ करेल,' अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

महायुतीमध्ये 90 टक्के जागांवर एकमत झाले आहे. केवळ 10 टक्के जागांवर एकमत होणे बाकी आहे. ते देखील लवकरच होईल. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांची वीज बिल माफी, अशा अनेक योजनांना केंद्र सरकारचा सपोर्ट आम्हाला आहे. त्यामुळेच हे डबल इंजन सरकार महाराष्ट्राच्या जनतेचं काम करत असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

यावेळी महाविकास आघाडीवर देखील त्यांनी टोला लगावला आहे. महाविकास आघाडीची सत्ता चुकूनही राज्यात आली, तर ते केंद्र सरकारची मदत घेणार नाहीत. केंद्र सरकार मदत करण्यासाठी तयार असले तरी देखील ते मदत घेणार नाही. त्यामुळे माविआ राज्याचा बट्ट्याबोळ करेल. म्हणून युतीचंच सरकार चांगलं काम करणार असल्याचा विश्वास बावनकुळे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. तर लोकसभेत खोटं बोलून मत घेतले आहेत,आता जनता त्याच कोणी भुलणार नाही, उद्धव ठाकरेंची काँग्रेसच्या दृष्टीने उपयुक्तता संपले आहे. त्यांना दिल्लीमध्ये कोणी भेटत नाही, पवार बाळासाहेब असताना भाजप शिवसेना युती तोडू शकले नाही, ते उद्धव ठाकरे यांच्या काळात त्यांनी केलं. उद्धव ठाकरे यांचा निवडणुकीत वापर करून घेतील, त्यांना मुख्यमंत्री करणार नाहीत, शरद पवारांनी त्यांचा मोठा मजाक केला आहे, अशी टिका देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या पहिल्या यादीची शक्यता देखील आज वर्तवण्यात आली आहे. त्यातच महायुतीतील जागावाटपाची चर्चा अद्यापही सुरू आहे. या जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी महायुतीतील तीन प्रमुख नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्लीत अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com