BJP News : भाजपचा शत प्रतिशत अजेंडा; नव्या मंत्रिमंडळात दिसणार 'पंच'

Maharashtra Assembly News : विधानसभा निवडणुकीत भाजपने आत्तापर्यंतचं सर्वात मोठं यश मिळवलं आहे. २०२९ साठी भाजप शत प्रतिशतचा अजेंडा राबवण्याची शक्यता असून त्यासाठी आत्तापासूनच मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली आहे.

भाजपने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आत्तापर्यंतचं सर्वात मोठं यश मिळवलेलं आहे. भाजपकडे बहुमतासाठी फक्त बारा जागा कमी पडलेल्या आहेत. मात्र पुढच्यावेळी भाजप शत प्रतिशतचा अजेंडा राबवण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी अनुभवी, उत्तम प्रशासक तसंच भाजपचा अजेंडा खालपर्यंत पोहोचवणारे तगडे पाच चेहरे यावेळच्या मंत्रिमंडळात असू शकतात, असं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. यामध्ये सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे आणि राधाकृष्ण विखे-पाटील यांचा समावेश असेल. त्यामुळे यंदाच्या मंत्रिमंडळात भाजपचा पंच बघायला मिळू शकतो.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळवलं आहे. त्यामुळे महायुतीत भाजप हा वरचढ पक्ष ठरत आहे. राज्याच्या मुख्यमंत्रिपदाबरोबरच मंत्रिमंडळातील महत्वाच्या पदांवर देखील भाजपकडून दावा सांगण्यात येत आहे. यावेळी स्वबळावर बहुमत सिद्ध करायला भाजपला केवळ बारा जागा कमी पडल्या आहेत. त्यामुळे २०२९च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून शत प्रतिशतचा अजेंडा राबवला जाऊ शकतो असं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यासाठी भाजपकडून आत्तापासूनच पक्ष बांधणीचं काम सुरू होईल. भाजपचा हा अजेंडा खालपर्यंत पोहोचवला जावा यासाठी मंत्रिमंडळात पाच अनुभवी आणि उत्तम प्रशासक असेलेले पाच मोठे चेहरे भाजपकडून देण्यात येणार आहे, असं सूत्रांनी सांगितलं आहे. यात गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे-पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे अशा मातब्बर चेहऱ्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावेळी तरी महायुतीत भाजप हाच मोठा भाऊ असल्याचं बघायला मिळणार आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com