Mumbai Mayor Race : भाजपचा नवा डाव? MIM–मनसेला रोखण्यासाठी मास्टरप्लान?

bjp strategy to stop MIM and MNS in mumbai : मुंबई महापालिका निवडणूक निकालानंतर एमआयएम आणि मनसेला रोखण्यासाठी भाजपनं प्लान आखलाय. भाजपने शिंदेंच्या शिवसेनेला संयुक्त गटस्थापनेचा प्रस्ताव दिला आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपच्या ८९ जागा निवडून आल्यात. तर शिंदेंच्या शिवसेनेनं २९ जागांवर विजय मिळवला आहे. ठाकरेंची शिवसेना क्रमांक दोनचा पक्ष ठरला आहे. स्पष्ट बहुमत कुणालाच न मिळाल्यानं सत्तास्थापनेचा पेच वाढला आहे. त्यात काहीसं यश मिळवणाऱ्या एमआयएम आणि मनसे या दोन पक्षांना रोखण्यासाठी भाजपनं नवा प्लॅन तयार केलाय. भाजप आणि शिंदेसेना एकत्र गट स्थापन करणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालीय. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने शिंदेसेनेला संयुक्त गट स्थापनेचा प्रस्ताव दिलाय. दोन्ही पक्षांनी मिळून एक गट केल्यास महायुतीला एक अतिरिक्त नगरसेवक मिळू शकतो, तसेच स्थायी समितीसह विविध समित्यांमध्ये युतीची ताकद वाढेल, असा दावा आहे. मात्र वेगळे गट राहिल्यास मनसेला समित्यांमध्ये संधी मिळू शकते, अशीही शक्यता व्यक्त केली जातेय. दरम्यान भाजपच्या प्रस्तावावर शिंदेसेनेचा निर्णय अद्याप झालेला नाही, असंही सूत्रांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com