Vidhan Sabha Election : विधानसभेसाठी भाजपची व्यवस्थापन समिती जाहीर; रावसाहेब दानवे, नितीन गडकरींकडे मोठी जबाबदारी

BJP management committee announced : माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली भाजपने व्यवस्थापन समिती जाहीर केली आहे. या समितीत अनेक बड्या नेत्यांचा समावेश आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत जबर फटका बसल्यानंतर भाजप नेते खडबडून जागे झाले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून त्यांनी आतापासूनच जोरदार तयारी सुरु केली आहे. यासाठी वेगवेगळ्या रणनित्या आखल्या जात आहे. अशातच माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली भाजपने व्यवस्थापन समिती जाहीर केली आहे. या समितीत अनेक बड्या नेत्यांचा समावेश आहे.

भाजपच्या व्यवस्थापन समितीत विशेष आमंत्रित म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, विद्यमान खासदार नारायण राणे, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, आमदार गणेश नाईक आणि हंसराज अहिर यांच्या नावांचा समावेश आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com