BJP : भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीची तारीख ठरली?

Assembly Election : विधानसभा निवडणूकीचं रणशिंग लवकरच फुंकले जाणार आहे. त्यासाठी भाजपकडून आपली पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

दसऱ्यापर्यंत भाजपची पहिली उमेदवारी यादी जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. मंगळवारी रात्री सागर बंगल्यावर भाजपच्या प्रमुख नेत्यांची मॅरेथॉन बैठक पार पडली आहे. या बैठकीत उमेदवारांच्या यादीवर शिक्कामोर्तब झालं आहे. दरम्यान, मुंबई, कोकण विभागानंतर आज उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्हानिहाय बैठका होत आहेत. यानंतर विदर्भ आणि मराठवाड्याच्या बैठकाही येत्या दोन दिवसांत पर पडतील अशी माहिती मिळत आहे.

विशेष म्हणजे हरियाणातील विजयानंतर भाजपची बार्गेनिंग पॉवर महायुतीत आता वाढलेली दिसत आहे. महाराष्ट्रात भाजप 155 जागांवर निवडणूक लढण्यावर ठाम आहे. अद्यापही जागावाटपाचा तिढा सुटलेला नसला तरी आता दसऱ्यापर्यंत भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाईल असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता कोणाला संधी मिळणार हे बघण महत्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com