Bhiwandi News: एक तासाच्या पावसाने भिवंडीकरांची दाणादाण, नागरिकांच्या घरात चक्क गटारीचं पाणी | VIDEO

Drainage system failure in Bhiwandi: भिवंडीमध्ये झालेल्या एका तासाच्या पावसाने शहरात राहणाऱ्या नागरिकांच्या घरात अक्षरशः गटारीचे पाणी शिरल्याने नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.

भिवंडीत काल संध्याकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. एक तासभर कोसळलेल्या मुसळधार पावसाने भिवंडीकरांची दैना उडाली होती. शहरातील अनेक सकल भागांमध्ये पाणी साचले होते.तर काही नागरिकांच्या घरात गटारीचे दूषित पाणी शिरल्याने मनपा प्रशासनाचा नालेसफाईचा दावा फोल ठरला आहे.

शहरातील पद्मा नगर येथील श्रीरंग नगर व भद्रावती नगर मध्ये नागरिकांच्या घरात नाल्याचे दूषित पाणी शिरले , त्यामुळे अनेकांचे घरातील सामानाचे नुकसान झाले. नाला व गटारातील पाणी घरामध्ये शिरल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातील अंजुर फाटा,रांजनोली नाका ,कल्याण नाका,ईडगाह रोड,वंजारपट्टीनाका,तीन बत्ती परिसर,कल्याण नाका, कमाला हॉटेल,पटेल नगर,भाजी मार्केट अशा अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांसह प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com