Beed Teacher Suicide: शिक्षकाने जीवन संपवण्याआधी चिठ्ठीत उल्लेख केलेल्या मुंडेंना अटक कधी होणार? VIDEO

Munde Arrest Delay: बीड जिल्ह्यात वारंवार घडणाऱ्या गुन्हेगारीमुळी संपूर्ण महाराष्ट्राचे बीड जिल्हयाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. अशातच तेथील गुन्हेगारांना अटक करण्यास पोलीस इतका विलंब का लावतात असा प्रश्न सर्व सामान्य नागरिक विचारत आहे.

बीड जिल्ह्यात धनंजय नागरगोजे या शिक्षकाने 18 वर्षे पगार मिळाला नाही म्हणून स्वतःचे जीवन संपवले. कृष्णा अर्बन को ऑपरेटीव्ह बँक लिमिटेडच्या शाखेसमोरच नागरगोजे यांनी फाशी घेतली. 18 वर्षे शाळेत काम करूनही वेतन मिळत नसल्याने या शिक्षकाने आत्महत्या केल्याची मन सुन्न करणारी घटना काही दिवसापूर्वी घडली होती. आत्महत्येआधी नागरगोजे यांनी पत्र लिहून आपल्या मुलीची माफी मागितली होती. या पत्रात त्यांनी आत्महत्या कोणामुळे केली त्या लोकांची नावे घेतली होती. विक्रम बाबुराव मुंडे, विजय विक्रम मुंडे, अतुल विक्रम मुंडे आणि गोविंद आव्हाड या लोकांची नावे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. मात्र अद्यापही या लोकांना पोलिसांनी अटक का केली नाही हा प्रश्न कायम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com