Beed: राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षाच्या जावयावर उधळल्या नोटा, कवाली कार्यक्रमातील VIDEO व्हायरल

Beed Politics : बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगराध्यक्षांच्या जावायावर नोटा उधळल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. कवाली कार्यक्रमातील हा व्हिडीओ असून तो व्हायरल होत आहे.

बीड नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगराध्यक्षा प्रेमलता पारवे यांच्या जावयावर पैसे उधळण्याचा व्हिडिओ समोर आला आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत अजित पवार पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी पारवे या निवडून आलेल्या आहेत. बीड शहरात आयोजित एका कव्वालीच्या कार्यक्रमादरम्यान मुजीब शेख यांच्यावर पैशाच्या नोटा उधळण्यात आल्या.

नगरपालिका निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रेमलता पारवे यांना तिकीट देण्यात आले होते मात्र प्रचार करत असताना मुजीब शेख यांच्या सासू आहेत असा प्रचार करण्यात आला होता. विशेष म्हणजे सर्व नगरपालिका निवडणूकीत मुजीब शेख यांचे फोटो आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्याकडून अशा पद्धतीने पैशाची उधळण केल्याने चर्चेला उधाण आले आहे तर सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com