सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आरोपी वाल्मिक कराड याच्यावर उपचार करणाऱ्या सिविल सर्जन अशोक थोरात यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अशोक थोरात यांचं आलिशान हॉटेल असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. थोरात हे बीड रुग्णालयात सिविल सर्जन आहेत. त्यांची चौकशी व्हायला हवी असं देखील दमानिया यांनी म्हंटलं आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केलं आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी डॉक्टर अशोक थोरात यांच्याविषयी एक ट्वीट केलं आहे. अशोक थोरात हे बीड हॉस्पिटलमध्ये सिविल सर्जन असून वाल्मिक कराड याच्यावर उपचार केला आहे. अशोक थोरात यांचं पियुष इन हे हॉटेल आहे, असं दमानिया यांनी म्हंटलं आहे. त्याबद्दलची माहिती त्यांनी ट्विटमध्ये टाकली आहे. यात त्यांनी लिहिलं आहे की, इतकं मोठं हॉटेल आंबेजोगाईत आहे. त्यांची चौकशी केली असता ते विमल मुंदडा यांचे ओएसडी होते, त्या काळात त्यांनी अफाट पैसा कमावला. त्यांच्याविषयी अनेकांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. शासनाने त्यांच्यावर केलेले आरोपाचे दोन जोडपत्र वाचले. पहिल्यात १२ आणि दुसऱ्यात १२ असे २४ आरोप त्यांच्यावर आहेत. त्यानंतर त्यांची बदली करण्यात आली. दोनदा वी.आर. एसची मागणी करूनसुद्धा मागणी मान्य केली नाही. कारण त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे झालेले आरोप गंभीर आहेत. असा व्यक्ती बीडचा सिविल सर्जन का असावा ? ११ रुग्णांना बाहेर काढून १ ठणठणीत गुन्हेगार आयसीयुमध्ये ठेवला. मला अनेक गोष्टी दिसल्या म्हणून त्या गोष्टी जनतेसमोर आणण्यासाठी मी ट्विट केले, असं दमानिया यांनी म्हटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.