Beed Crime: मैं हूँ डॉन...; वाढदिवसाच्या पार्टीत सरपंचाकडून हवेत गोळीबार, बीडमध्ये खळबळ|VIDEO

Beed Sarpanch Airgun Firing Birthday Celebration: बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रुई गावातील सरपंचाने वाढदिवसानिमित्त एअरगनमधून हवेत गोळीबार केला. या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवली असून कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेवराई तालुक्यातील रुई गावातील सरपंच आणि उपसरपंच यांचा महाप्रताप समोर आला आहे. वाढदिवसानिमित्त सरपंचाने चक्क एअरगनमधून हवेत गोळीबार केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकत दहशत पसरवण्याचा प्रयत्न या टोळीने केला. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांची वचक राहिली का, असा सवाल उपस्थित होत आहे.

यापूर्वीच बीड जिल्ह्यात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणामुळे कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांकडून मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकणे, रिव्हॉल्वर घेऊन रील्स तयार करून दहशत पसरवणे असे प्रकार वाढले आहेत. आता तर चक्क गावातील सरपंचानेच एअरगनमधून गोळीबार करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर बीड पोलिस प्रशासन कोणती कारवाई करणार, हा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com