सततच्या पावसामुळे बीडमध्ये फळबागांना मोठा फटका; ड्रॅगन फ्रूटचा चिखल|VIDEO

Beed Farmer Dragon Fruit Crop: बीड जिल्ह्यात सततच्या पावसामुळे फळबागांना मोठा फटका बसला आहे. गेवराई तालुक्यातील शेतकरी राजेभाऊ आवटे यांनी तीन एकर ड्रॅगन फूट शेती केली होती.

बीड जिल्ह्यात सतत होणाऱ्या पावसामुळे आता फळबागांनाही मोठा फटका बसला आहे. गेवराई तालुक्यातील सुशी वडगाव येथील शेतकरी राजेभाऊ आवटे यांनी पारंपारिक शेतीला जोड म्हणून तीन एकर क्षेत्रात ड्रॅगन फूटची शेती केली होती. मात्र, सलग पावसामुळे संपूर्ण पीक खराब झाले असून शेतकऱ्याचे अंदाजे ८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

राजेभाऊ आवटे यांनी सांगितले की, भर उन्हाळ्यात विकत पाणी घेऊन शेती सांभाळली, मात्र सलग पावसामुळे संपूर्ण मेहनत आणि खर्च व्यर्थ गेला. आम्हाला या नुकसानीची तात्काळ भरपाई मिळावी, अशी त्यांनी मागणी केली आहे. सदर घटना बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी चिंता वाढवणारी ठरली आहे, कारण सतत पाऊस आणि पुराच्या परिस्थितीमुळे केवळ पिकच नाही तर शेतकऱ्यांचे उत्पन्नही मोठ्या प्रमाणात धोक्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com