Ajit Pawar Group : अजित पवार गटात वादंग; मावळ विधानसभेत सुनील शेळकेंना विरोध

Maval Assembly Constituency : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य उमेदवार तयारीला लागलेले असतानाच अजितदादांच्या राष्ट्रवादीत पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे.

मावळ मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत फुट पडण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतले बापू भेगडे यांनी महामंडळ नाकारलं असून विधानसभा निवडणूक लढवण्यावर ते ठाम आहेत. त्यामुळे मावळचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांच्या उमेदवारीला आता अजित पवार यांच्या गटातूनच विरोध होताना दिसत आहे.

राज्यात विधानसभा निवडणूकीचं रणशिंग फुंकलं गेलं आहे. लवकरच सगळ्या पक्षांकडून जागावाटप ठरून उमेदवारांची नावं घोषित केली जाणार असतानाच आता पक्षांतर्गत धुसफूस समोर यायला लागल्या आहेत. मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीतून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मावळमध्ये अजित पवार गटाचे नेते बापू भेगडे यांनी महामंडळाचं पद नाकारलं असून विधानसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. याबद्दल अजितदादांसोबत चर्चा करणार असल्याचंही त्यांनी म्हंटलं आहे. त्यामुळे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांना आता स्वत:च्याच पक्षातून विरोध होताना दिसत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com