नाशिकमध्ये आज शिवसेना ठाकरे गटाचा निर्धारित कार्यक्रम पार पडत आहे. यावेळी बाळासाहेब ठाकरेंचे या पूर्वी कधीही न ऐकलेले भाषण दाखवले गेले. या भाषणातून बाळासाहेब ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीकास्त्र सोडले.
बाळासाहेब ठाकरे म्हणाले, तुमचे शंभर बाप खाली उतरले तरी शिवसेना कधीच संपणार नाही. अशा शब्दांत त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ते पुढे म्हणाले, शिवसेनेने कधीच कोणाच्या पाठीत वार केला नाही, पण आज महाराष्ट्राच्या पाठीत वार सुरू आहे. हा सगळा पैशांचा खेळ आहे. महाराष्ट्राला एवढं इंग्रजांनी आणि मुघलांनी लुटलं नव्हतं, जितकं हे भाजपवाले लुटत आहेत. ते सुद्धा हिंदुत्वाच्या नावाखाली.
भारतीय जनता पक्षाला आम्ही हिंदुत्वासाठी मोठं केलं, पण आज हिंदुत्वाचे खरे मारेकरी कोणी असतील तर ते हेच लोक आहेत. हिंदुत्व तुमचं खाजगी मालमत्ता नाही. हिंदूंमध्ये भांडणं लावली जात आहेत, जाती, पोटजातीमध्ये मारामाऱ्या लाऊन ते नाना फडणवीस मजेणे बघतय.
एक गोष्ट ठासून सांगतो. तुमचे शंभर बाप खाली उतरले तरी शिवसेनेचं अस्तित्व तुम्ही संपवू शकणार नाही. शिवसेनेने पन्नास वर्षांत खूप सहन केलं आहे. सतत आव्हानं दिली गेली, आणि आम्ही ती आव्हानं स्वीकारली देखील.अशी कडाडून टीका बाळासाहेब ठाकरेंनी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.