Beed News: पुन्हा मैदानात या बजरंग सोनवणेंच्या मैत्रीदिनानिमित्त धनंजय मुंडेंना शुभेच्छा|VIDEO

Bajarang Sonawane Reaction To Ghotya Gite: बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी गोट्या गीतेच्या धमकीच्या व्हिडिओवर टीका केली. गृहखात्याचं अपयश असल्याचं सांगत त्यांनी धनंजय मुंडेंना मैत्रीदिनी शुभेच्छा देत लवकर बरे होण्याच्या सदिच्छा व्यक्त केल्या.

बीड: महादेव मुंडे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गोट्या गीतेने पुन्हा एकदा सोशल मीडियावरून धमकीचा व्हिडिओ जारी केल्यानंतर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. फरार आरोपी जगजाहीर व्हिडिओ देतोय, आणि अजूनही तो मोकाट आहे, हे थेट गृहखात्याचं अपयश आहे, असा घणाघात त्यांनी केला.

गोट्या गीतेच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना सोनवणे म्हणाले, धमक्या देणारे काय करतात हे सगळ्यांना माहिती आहे. पण ज्यांच्यावर अन्याय झालाय, त्या समाजासाठी न्याय मिळाला पाहिजे. जो आरोपी आहे, तो व्हिडिओमध्ये जे काही बोलतोय, त्याच्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे. पुढे बोलताना ते म्हणाले, एसआयटी नेमली गेलीय हे मान्य आहे, मात्र अद्याप त्याचा तपशील माझ्या वाचनात आलेला नाही. गोट्या गीतेने केलेल्या आरोपांबाबत सोनवणे म्हणाले, त्याने काय आरोप केले, याला काहीही किंमत नाही. जे खोटं आहे, ते आम्ही खोटंच सिद्ध करणार. मी राजकीय पोळ्या भाजायला बसलेलो नाही. मी कुणा राजकारण्याचं लेकरू नाही.

धनंजय मुंडेंच्या प्रकृतीसाठी सदिच्छा

सन्माननीय माझे मित्र धनंजय मुंडे साहेब, तुम्ही मला विचारलं त्यावर सल्ला नाही, मात्र मैत्रीच्या शुभेच्छा नक्की देतो. त्यांची प्रकृती लवकर सुधारो आणि ते लवकरच पुन्हा राजकीय मैदानात येवोत, हीच सदिच्छा, असंही बजरंग सोनवणे यांनी नमूद केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com