Video: बदलापूरच्या घटनेचे कॅबिनेटमध्ये पडसाद

शाळांवर शिक्षण विभागाचे नियंत्रण असले पाहिजे आणि नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांचे व्यवस्थापन, मुख्याध्यापक आणि जबाबदार अधिकारी यांच्यावरही कठोर कारवाई करावी असंही एकनाथ शिंदे म्हणालेत.

Badlapur Case News: बदलापूर येथील शाळेत आणि राज्यात अन्य ठिकाणी लहान मुली व महिलांवर झालेल्या अत्याचारांच्या घटनेचे तीव्र पडसाद रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उमटले. शाळेतील स्वच्छतागृहात लहान मुलींना नेण्याची जबाबदारी पुरुष कर्मचाऱ्यावर कशी असा सवाल करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुली व महिला अत्याचारांच्या घटनांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. या गुन्हेगारांवर आणि नियमांचे पालन न करणाऱ्या शाळा व्यवस्थापन व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश शिंदे यांनी दिले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com