Bachhu Kadu: पोलिसांनी विनाकारण त्रास दिला तर मी...; बच्चू कडूंचा निर्वाणीचा इशारा|VIDEO

Bachchu Kadu Threatens Action : शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नांवर बच्चू कडू यांनी उपोषणास्त्र डागले आहे, यावेळी त्यांनी सरकारला मोठा इशारा दिला आहे.

माजी मंत्री तथा प्रहार पक्षाचे प्रमुख बच्चू कडू हे दिव्याग, शेतकरी आणि विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसले असून आज त्यांचा चौथा दिवस आहे. बच्चू कडू यांचे 3 किलोने वजन देखील कमी झाले आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. सरकार आमचा अंत पाहत आहे, हे आंदोलन मोडीत कसे काढेल यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, असा आरोप कडू यांनी केला. तसेच आंदोलकांना पोलिसांनी विनाकारण त्रास दिला तर मी स्वतः आयजीच्या कार्यालयात घुसेल असा गंभीर इशारा त्यांनी दिला. कार्यकर्त्यांना विनाकारण त्रास द्यायचं काम नाही, कायदा हा सरकारने मोडला आहे. आम्ही शांततेत आंदोलन करू, आता बैठक, आश्वासन वगैरे चालणार नाही. निर्णय लागेल निर्णय द्यावा निर्णय देता येत नसेल तर आमच्या अंतयात्रेची व्यवस्था करावी सरकार ने करावी असा निर्वाणीचा इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com