Bachhu Kadu: विधानसभेत आक्रमक असणारे बच्चू कडू आता विधानपरिषदेच्या रिंगणात, शिक्षक मतदारसंघातून लढण्याची फिल्डिंग, VIDEO

From Assembly to Council : अचलपूर मतदार संघातून पराभव झाल्यानंतर बच्चू कडू यांनी शिक्षक मतदारसंघातून लढल्याची तयारी सुरू असल्याचे संकेत दिले आहेत.

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडूंची विधान परिषदेच्या आखाड्यात उतरण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. बच्चू कडूंनी अमरावती विभाग शिक्षक मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी फिल्डिंग लावत असल्याचा सांगितले जात आहे. ही निवडणूक पुढच्या वर्षी म्हणजे २०२६ मध्ये होणार आहे.

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघातून विधानसभेच्या निवडनूकीत पराभव झाल्यानंतर बच्चू कडूंची शिक्षक मतदार संघातून लढण्याची तयारी सुरू असल्याचे समोर आले आहे. बच्चू कडूंनी तब्बल चार वेळा अचलपुरातून विजय मिळवला होता. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अचलपुरातून भाजपच्या प्रवीण तायडे यांनी बच्चू कडूंचा १२१३१ मतांनी पराभव केला होता. त्यानंतर आता बच्चू कडू डिसेंबर २०२६ मध्ये होणाऱ्या अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक लढविणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com