Baba Siddique Funeral: बाबा सिद्दिकींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, VIDEO

Baba Siddique Death Case : बाबा सिद्दीकी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या पार्थिवावर रविवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बाबा सिद्दीकी यांचे पार्थिव त्यांच्या वांद्रे येथील निवासस्थानातून स्मशानात नेण्यात आले. यावेळी त्यांच्या समर्थकांचा मोठा जनसमुदाय उपस्थित होता. मुस्लिम रितीरिवाजांनुसार बडा कब्रस्तान येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बाबा सिद्दीकी यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. त्यांना मुंबई लाईनमधील बडा कब्रिस्तानमध्ये दफन करण्यात आलं. याआधी त्यांना शासकीय सन्मान देण्यात आला होता. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केवळ कुटुंबीयांनाच स्मशानभूमीत प्रवेश देण्यात आला. यावेळी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुनिल तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल देखील दफनविधीला उपस्थित होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com