Maharashtra Politics: बीडमधील नेते पवारांच्या तालमीत मोठे झाले, अंजली दामनियांचा शरद पवार यांच्यावर घणाघात, VIDEO

Anjali Damania Attacks Sharad Pawar: शरद पवार यांनी बीडमध्ये जी परिस्थिति निर्माण झाली आहे, यावर चिंता व्यक्त केली. त्यानंतर अंजली दामनिया यांनी जुने दाखले देत शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

बीड जिल्हा हा सर्वांना सोबत घेऊन चालणारा होता. हा जिल्हा अत्यंत शांत होता. आज जो बीड आहे,तसा यापूर्वी कधीच नव्हता.बीडची आजची परिस्थिति ही अत्यंत गंभीर आहे असे विधान शरद पवार यांनी केले.शरद पवार यांच्या या विधानावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामनिया यांनी पलटवार केला आहे.ज्या लोकांमुळे आज बीडची परिस्थिति गंभीर झाली आहे,ते लोक तुमच्याच तालमीत मोठे झाले आहेत अशी प्रतिक्रिया देत अंजली दामनिया यांनी शरद पवार यांच्यावरच टीकेच अस्त्र सोडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com