बीड येथील शिरूर कासार येथे सतीश भोसले उर्फ खोक्याने ढाकणे कुटुंबाला मारहाण केल्यानंतर त्याचे अनेक कांड समोर आले. त्यानंतर त्याच्या प्रयगराजमधून मुसक्या देखील आवळण्यात आल्या.आता त्याची पोलिसांनी कार देखील जप्त केली आहे. यावरच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामानिया यांनी सरकारला सवाल केले आहे. सतीश भोसलेवर कारवाई होते,त्याची गाडी जप्त होते. मग कोरटकर ज्यांनी इंद्रजित सावंतांना धमकी दिली,त्यांना फरार होऊ दिल जात त्यांची Rolls Royce जप्त होत नाही, जप्त तर सोडा, त्याची चौकशी होत नाही का ? ते ब्राह्मण आहेत म्हणून ? हा जातीवाद बंद झाला पाहिजे असा सवाल करत त्यांनी सरकारवर निशाण साधला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.