Anganwadi workers : अंगणवााडी सेविकांच्या मानधनात वाढ होणार? वित्त विभागाकडे प्रस्ताव सादर
मुंबई : अंगणवााडी सेविकांच्या मानधनाबाबत महत्वाची बातमी हाती आली आहे. महिला विकास विभागाकडून तीन हजार ते पाच हजार रुपयांची मानधन करण्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर करण्यात आला आहे. मुंबईत १२ ऑगस्टपासून अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरु आहे.
राज्यात १ लाख २० हजार अंगणवाडी सेविका आहेत. तर ६० हजार मदतनीस आहेत. अंगणवाडी सेविकांना १२ हजार मानधन आहे. तर मदतनीसांना ८ हजार मानधन आहे. मानधनात वाढ व्हावी, अशी त्यांची मागणी आहे. या प्रस्तावानंतर मानधन वाढणार का, याकडे सेविकांचं लक्ष लागलं आहे. या प्रस्तावानंतर मानधनात वाढ होते का, हे पाहावे लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.